Pradeep Sarkar | मुंबई : बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. आज (ता. २४) पहाटे ३.३० वाजता त्यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. सरकार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
दुपारी ४ वाजता प्रदीप सरकार यांच्यावर अंत्यसंस्कार…
मुंबईतील सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता प्रदीप सरकार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रदीप यांच्या निधनाने पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून, कलाकार, तंत्रज्ञ असे अनेक सेलिब्रिटी सोशल मिडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दिग्दर्शकाच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
अभिनेत्री नीतू चंद्राने ‘परिणीता’ फेम दिग्दर्शकाच्या निधनाची पुष्टी केली. प्रदीप सरकार हे तिचे पहिले दिग्दर्शक होते, तिने महाविद्यालयात असतानाच एका फुटवेअर ब्रँडच्या जाहिरातीसाठी दिग्दर्शकासोबत पहिल्यांदा एकत्र काम केले होते. प्रदीप यांच्यासोबत काम करणारे सहकारी आणि कलाकार अशा सगळ्यांनी शोक व्यक्त केलाय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत
Entertainment News : मराठी अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या
Gautami Patil : गौतमी पाटीलवर सुरेखा पुणेकर यांनी साधला निशाणा ;अंगभर कपडे घालून लावणी सादर करावी..