ये बाबुराव का स्टाईल है…! हा डायलॉग आज प्रत्येक लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तोंडपाठ आहे. हा डायलॉग फक्त ऐकला तरी पूर्ण चित्रपट अगदी डोळ्यासमोर येतो. मग ती अभिनेता अक्षय कुमारची ऍक्टिंग असो….किंवा मग अभिनेता सुनील शेट्टीची…सगळ्यांना या त्रिकुटाची पात्र अगदी तोंडपाठ आहेत. आता पुन्हा एकदा या चिंत्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. आणि त्याचे कारणही तसेच आहे. तब्बल १९ वर्षांनंतर ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटाचा पुढचा भाग मोठ्या पडद्यावर येणार आहे. अशातच आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘बाबुराव का स्टाईल!’ बघायला मिळणार म्हणून उत्सुकता आहे. पुन्हा एकदा परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाची अॅानस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. पण असे असतानाच अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. आणि म्हणूनच चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उठला आहे.

हेरा फेरी, फीर हेरा फेरी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये परेश रावल यांनी धमाल कामगिरी केल्यानंतर आता तिसऱ्या भागात देखील प्रेक्षकांना परेश रावल यांची धमाल कॉमेडी पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली होती. पण बाबुराव अर्थात परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्यानंतर हेरा फेरी 3’ ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच आता परेश रावल यांच्या जागी कोणाची एंट्री होणार? असा प्रश्न आता सर्व चाहत्यांना पडला आहे.

खरं तर ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीतील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तीन अभिनेत्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यातील एकाही अभिनेत्याने एक्सिट घेतली, तर प्रेक्षकांचा हिरमोड होणार ये नक्कीच! आणि म्हणूनच परेश रावल यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांना न पटणाराच आहे.

परेश रावल यांना ‘बाबुराव आपटे’ या भूमिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, बाबुराव हे फक्त एक काल्पनिक पात्र नसून, बाबूराव हे पात्र एक व्यक्ती खऱ्या आयुष्यात जगत असून त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा असल्याचं परेश रावल यांनी सांगितलं आहे. चला तर मग त्याबद्दल पाहूया…
परेश रावल हे अभिनेता विजय केंकरे यांच्यासोबत ‘कोण होणार मराठी करोडपती’ या शोमध्ये सामील झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी बाबुराव या पत्राबद्दल सर्वकाही सांगितले. हेरा फेरीमध्ये बाबुरावची भूमिका कशी मिळाली? या पात्राची प्रेरणा कशी मिळाली? याबद्दल बोलताना ते म्हणाले, “विलेपार्लेमध्ये एक व्यक्ती आहे त्याचे नाव ‘रजत ढोलकिया’ आहे ज्याचे व्यक्तिमत्त्व अगदी बाबुरावांसारखे आहे. आम्हाला त्याच्यात ते पात्र सापडले. राजा त्याच्यासारखाच आहे आणि मी हेरा फेरीमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेची नक्कल करण्याचा निर्णय घेतला. त्याची चालण्याची शैली आणि व्यक्तिमत्त्व, मी माझ्या व्यक्तिरेखेत ते साकारण्याचा प्रयत्न केला.” असं परेश रावल यांनी स्वतः सांगितले.
‘रजत ढोलकिया’ हे सामान्य व्यक्तिमहत्व नसून, गुजराती थिएटरमधीलते एक प्रसिद्ध संगीतकार आहेत. आणि त्यांच्यांवरूनच हे पात्र प्रेरित आहे. रजत ढोलकिया यांना प्रेमाने ‘जुकू’ असेही म्हणतात. पांढरी बनियन, जाड भिंगाचा चष्मा अशाच अवतारात रजत ढोलकिया दिसतात. एवढंच काय तर त्यांची बोलण्याची स्टाईलही अगदी तशीच आहे. जेव्हा रजत ढोलकियांना हे कळलं की आपल्यावरुनच हे बाबुराव पात्र घेण्यात आलं आहे तेव्हा तेही खूप हसले.
रजत ढोलकिया यांनी ‘धारावी’, ‘होली’, ‘मिर्च मसाला’, ‘ 1942 अ लव्ह स्टोरी’ सारख्या सिनेमांमध्ये संगीत दिग्दर्शन केलं आहे. एवढंच काय तर परेश रावल यांनी रजत ढोलकिया यांच्यासोबत काही जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे.
परेश रावल यांची जागा कोण घेणार?
आता परेश रावल यांनी फीर हेरा फेरी ३ मधून माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी एका नावाची जोरदार चर्चा होत आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील स्टार अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव बाबुराव पात्रासाठी पुढे येत आहे. सध्या नाना पाटेकर ‘हाउसफुल-5’ मध्ये काम करत आहेत. नाना पाटेकर देखील त्यांच्या अनोख्या भूमिकांसाठी ओळखले जातात. आता ‘बाबुराव’च्या हटके पात्रासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत आहे.
दरम्यान, आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे परेश रावल यांनी चित्रपटामधून माघार का घेतली? यापूर्वी जेव्हा त्यांनी फीर हेरा फेरी ३ मधून माघार घेतली तेव्हा त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी तयार करण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा त्यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. पण आता त्यांच्या या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या अभिनेते इतर चित्रपटनामध्ये काम करत असून देखील त्यांनी या चित्रपटाला नकार का दिला? दोनवेळा चित्रपटाला नकार देण्याचे कारण काय? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.







