पुणे प्राईम न्यूज: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलमध्ये अडकली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते खूपच चिंतेत पडले होते आणि नुसरत सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता अभिनेत्रीबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
नुसरत भरुचा भारतात परतणार
इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचा हिच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. अभिनेत्री पूर्णपणे सुरक्षित आहे. इस्रायलमधून बाहेर पडण्यासाठी ती विमानतळ परिसरात पोहोचली आहे. अभिनेत्री लवकरच विमानाने इस्रायल सोडणार आहे आणि आपल्या देशात परतणार आहे. नुसरतचे कुटुंब, चाहते आणि संपूर्ण देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. सर्वजण नुसरतच्या सुखरूप मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत.
नुसरत भरुचाच्या टीमने सांगितले की, अखेर आम्ही नुसरत भरुचा यांच्याशी संपर्क साधला आहे. दूतावासाच्या मदतीने तिला भारतात सुखरूप परत आणले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत भरूचा फ्लाइटमध्ये चढली आहे. अडचणींनंतर ती भारतात परतत आहे. नुसरत दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत पोहोचेल.
नुसरत इस्रायलमध्ये कशी अडकली?
नुसरत भरूचा हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग होण्यासाठी इस्रायलला गेली होती. पण त्याच दरम्यान तिथे युद्ध सुरु झाले आणि नुसरत तिथेच अडकली. अभिनेत्रीच्या टीमने याबाबत माहिती दिली होती. माहिती देताना तिच्या टीमने अभिनेत्री तळघरात असून सुरक्षित असल्याचे सांगितले होते. पण नुसरतसोबतच्या या संवादानंतर तिच्या टीमचा संपर्क तुटला तेव्हा चिंता वाढली. त्यांची टीम म्हणाली होती, आम्ही संपर्क करू शकत नाही. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. ती सुरक्षित परतेल अशी आशा आहे. आता ताज्या माहितीनुसार नुसरत सुखरूप विमानतळावर पोहोचली आहे. लवकरच ती युद्धक्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी विमानात बसणार आहे
या चित्रपटांमध्ये नुसरतचा अप्रतिम अभिनय
नुसरत भरुचाबद्दल बोलायचे तर ती बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. नुसरतने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा, ड्रीम गर्ल, जनहित में यारी, राम सेतू सारखे चित्रपट केले आहेत. नुसरत शेवटची अकेली चित्रपटात दिसली होती.
हमासकडून इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला
शनिवारपासून गाझामधील विविध भागात बॉम्बफेक सुरू आहे. या हल्ल्यात आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांतील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या हल्ल्याला युद्धाची सुरुवात असे वर्णन केले आहे. अलीकडच्या काळात हमासच्या माध्यमातून इस्रायलवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
हेही वाचा:
भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती, जाणून घ्या सविस्तर
अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली