पुणे : पुण्यात एक-दोन नव्हे तर तब्बल ११ सेलिब्रिटींचा शो शेवाळवाडी फाटा, नंदिनी टकले नगर येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी ५ ते रात्री १० यादरम्यान होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा होम मिनिस्टर शो होणार आहे. ‘सुभाष यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर’ हा शो सादर करणार आहे. हा कार्यक्रम न भूतो न भविष्यते एवढा मोठा करण्याचे नियोजन केलेले आहे. प्रसिद्ध उद्योजक व बांधकाम व्यावसायिक श्री राजननाना टकले व त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक प्रथमदादा टकले यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
कॉमेडी तडका या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला, रोल नंबर 18, ब्लॅंकेट, वचपा या चित्रपटांचा प्रमुख अभिनेता, विनोदाचा झंजावत असलेला, ऑन द स्पॉट कॉमेडी करणारा हजरजबाबी अभिनेता सुभाष यादव हा या संपूर्ण कार्यक्रमाचे अँकरिंग व नियोजन करणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख सेलिब्रिटींपैकी ऋता दुर्गुळे (फुलपाखरू झी मराठी व टाइमपास चित्रपट फेम), प्राजक्ता गायकवाड (स्वराज्य रक्षक संभाजी फेम येसूबाई), माधुरी पवार (तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब व अप्सरा आली शोची विजेती) रुक्मिणी सुतार (देव माणूस फेम सरु आजी), गायत्री जाधव (बबन,एकदम कडक फेम मुख्य अभिनेत्री), आयली घिया (हंटर फेम बॉलीवूड अभिनेत्री व फिट इंडिया चॅम्पियन) मयुरी घाडगे (सांज फेम), प्रमाला साळुंखे (मार्तंड मल्हारी फेम), रश्मी दहिरे (मॉडेल अभिनेत्री) जयश्री सोनुने (एकदम कडक फेम) या सेलिब्रिटींसोबत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रथम उपस्थित ५ हजार महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच प्रथम क्रमांकासाठी मानाची पैठणी व वॉशिंग मशीन , द्वितीय क्रमांकासाठी ३२ इंची एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी ब्रँडेड ओव्हन व अशी इतर आणखी सात बक्षिसे म्हणजेच एकूण दहा मोठी बक्षिसे बक्षिसे व सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन विजेत्या महिलांना पुणे शहर दर्शन हेलिकॉप्टरद्वारे सप्रेम भेट देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य असून लहानांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्व प्रेक्षक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. आपला सहभाग नोंदवण्यासाठी नंदिनी टकले नगर येथील नंदिनी बेलस या ऑफिसमध्ये नोंदणी सुरू करण्यात आली असून तेथे आपले नाव विनामूल्य नोंदवावे. अशी विनंती राजननाना टकले व प्रथमदादा टाकले यांनी केली आहे.
दरम्यान, या भव्य दिव्य संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी अंदाजे १५ हजार पेक्षा जास्त महिला व पुरुष प्रेक्षकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. तरी परिसरातील सर्व माता भगिनी पुरुष बंधू सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी व बक्षिसे जिंकण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या सेलिब्रिटी सोबत सेल्फी घेण्यासाठी उपस्थित राहावे. अशी विनंती राजननाना टकले यांनी केली आहे.