Nanded News: नांदेड : ‘जंगली रम्मी पे आवो ना महाराज’ गेल्या अनेक दिवसांपासून ही जाहिरात सोशल मीडियावर अनेकांच्या नजरेत येत आहे. विशेष बाब ही की ही जाहिरात अनेक बॉलिवूड कलाकार करताना दिसतात. सद्या जंगली रम्मी किंवा अन्य् रम्मी अॅपची तरुणाईला भुरळ पडली आहे. यामुळे अनेकजन कर्जबाजारी झाल्याचे बघायला मिळाले मात्र तरीसुद्धा तरुणाई या रम्मी अॅपला बळी पडताना दिसून येत आहे. त्याचे मुख्य कारण या अॅपची जाहिरात. जंगली रम्मी सारख्या अॅपची जाहिरात मोठ मोठे कलाकार करताना दिसून येत आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण जंगली रम्मीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दरम्यान यावरून एकाने थेट अजय देवगणला पत्र लिहित जाब विचारला आहे. या पत्राची जोरदार चर्चा पहावयास मिळाली.
पत्राची एकच चर्चा
नांदेडमधील महिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या विलास शिंदे यांनी अभिनेता अजय देवगणला पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये शिंदे यांनी ‘जंगली रम्मी’ या ऑनलाइन गेमची जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला तुम्ही स्वत: हा गेम खेळता का असा प्रश्न विचारला आहे. (Nanded News) तसेच हा गेम खेळून तुम्ही नेमके किती पैसे आजपर्यंत कमवले आहेत याची माहिती द्यावी अशी मागणीही शिंदेंनी केली आहे.
अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्याच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेल्या या पत्रामध्ये विलास शिंदेंनी जंगली रम्मी गेमची जाहिरात करण्याचा उद्देश काय आहे असं विचारलं आहे. (Nanded News) “आपण ज्या जंगली रम्मू ऑनलाइन गेमची जाहिरात करता तो जंगली रम्मी ऑनलाइन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकले आहेत? या जाहिरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुण व कर्जबाजारी तरुणांना आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे,” असा या पत्राचा विषय आहे.
महोदय अभिनेता अजय देवगन स. नमस्कार व राम राम आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरूण आहेत. ही तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खूप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरूणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांनी सोशल मीडियावर केले पाहिजे. पण, सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना हा गेम खेळण्याची जनु सवयच लागली आहे. याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत? त्यामुळे अनेक तरूणांना प्रश्न पडला आहे की, आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहेत? या जाहिरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरूणांना सांगितले पाहिजे.
नवतरूणांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत. याच गेमला काही राज्यात बंदी आहे, आपण मात्र बिनधास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरूणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे, हे पण आपण सांगितले पाहिजे. (Nanded News) आणि हाच गेम तुमच्या आजुबाजूचे किती मान्यवर खेळतात, हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरूणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरूणांना काय संदेश देत आहात, हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल, तर हाच उद्देश किती योग्य आहे? या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरूणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे ही विनंती.’ असं म्हणत शिंदे याने अजय देवगणने केलेल्या जाहिरातींवरून टीका केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Accident : भीषण अपघाताने पुन्हा पुणे हादरले! इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार 2 जखमी…!