मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील धमक्यांचे सत्र सुरुच आहे. यामुळे चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच सलमान खान आणि शाहरुख खान यांना धमक्या आल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याचदरम्यान आता बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता येथील भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीरपणे धमकी देण्यात आली आहे.
पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीनं दुबईहून त्यांना धमकी दिली आहे. त्यासोबत मिथून चक्रवर्ती यांना माफी मागण्यास सांगितले आणि याशिवाय त्यांनी सांगितलं की जर असं झालं नाही तर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्याचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात मिथुन चक्रवर्ती यांना धमकी देण्यात आली आहे.
दुबईत बसलेल्या पाकिस्तानी डॉनने एक व्हिडिओ जारी करून मिथुन चक्रवर्ती यांना जाहीरपणे धमकी दिली आहे. या व्हिडिओमध्ये शहजादने म्हटले आहे की, तुम्ही 10-15 दिवसांत तुमचा एक व्हिडिओ रिलीज करून माफी मागावी. तुमच्यासाठी माफी मागणे चांगले आहे आणि तुमची माफी योग्य आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानी डॉन शहजाद भाटी भडकला असून आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात मिथुन चक्रवर्ती यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात भाषण केले होते आणि त्यानंतरच संपूर्ण गोंधळ झाला होता. वास्तविक, यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. यासोबतच या भाषणाबाबत बोलायचे झाले तर ते म्हणाले की, ‘आज मी अभिनेता म्हणून नाही तर 60 च्या दशकातील मिथुन चक्रवर्ती म्हणून बोलत आहे. मी रक्ताचे राजकारण केल्यामुळे राजकारणातील डावपेच माझ्यासाठी नवीन नाहीत,’ असे ते म्हणाले.
तसेच कोणती स्टेप घेतल्यानं कोणतं काम होईल हे मला चांगलचं माहित आहे. मी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमोर हे बोलत आहे की त्यासाठी जे काही करणं गरजेचं असेल ते मी करेन. इथल्या एका नेत्यानं मला सांगितलं की हिंदूची हत्या करून त्यांना भागिरथीमध्ये वाहून देऊ. मला वाटलं होतं की मुख्यमंत्री त्यावर काही बोलतील, पण काहीच बोलले नाही, पण मी बोलतोय की तुम्हाला तुमच्याच जमिनीत पुरेन’, असं मिथुन चक्रवर्ती बोलताना म्हणाले.
दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांच्या याच वक्तव्यावर पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी संतापला आणि त्यानं धमकी देणारा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओत त्यानं म्हटलं की ‘पुढच्या 10-15 दिवसांत माफी मागा. मुस्लिमांना कापून त्याच्याच भूमित गाडण्याच्या वक्त्व्यावर राग व्यक्त केला.
View this post on Instagram