मुंबई: मराठी रंगभूमीवरील सर्वात मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25,000 हजार, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. आतापर्यंत 54 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरित केला जात आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 80 वर्ष नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित केले जाते.