मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता अशोक सराफ यांना राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही देखील केले आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपाच्या ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध गुणांचे दर्शन आपल्या अभिनयातून दाखवले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024