मुंबई: फुलवंती या चित्रपटातील मदनमंजिरी हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती कादंबरी चित्रपट रूपात ११ ऑक्टोबरला येणार आहे. अशी मी – मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी… अशी मी मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी… अशी ठसकेबाज शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची असून, वैशाली माडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत.
प्राजक्ता माळी हिच्यावर चित्रित करण्यात आले आहे. संगीत अविनाश-विश्वजित यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रवीण तरडे यांचे असून, दिग्दर्शन स्नेहल तरडे करत आहेत. छायाचित्रण महेश लिमये यांचे तर अविनाश- विश्वजित यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत.