Kiran Mane पुणे : ‘सम्यक पुरस्कार समिती ‘ तर्फे देण्यात येणारा ‘ सम्यक पुरस्कार ‘ पुरस्कार चित्रपट अभिनेते किरण माने (Kiran Mane )यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच गुलाब गजरमल ,रामहरी ओव्हाळ, रमेश राक्षे , उत्तम वनशिव, शरद जाधव आणि प्रा. के. व्ही. सोनकांबळे या मान्यवर व्यक्तींना सम्यक पुरस्कार जाहीर झालेला आहे.’सम्यक पुरस्कार समिती ‘चे संस्थापक अध्यक्ष नागेश भारत भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘या’ व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवशी दरवर्षी १० मे रोजी ‘स्वाभिमान दिन’ साजरा केला जातो. याचे औचित्य साधून दरवर्षी सम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समता स्वातंत्र्य ,बंधुता ही मूल्य जपणाऱ्या मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.फुले पगडी,सन्मानचिन्ह,संविधानाची प्रत,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम बुधवार,दि. १० मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच , पुणे येथे होणार असून सर्वांना मुक्त प्रवेश आहे . कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ आंबेडकरी विचारवंत वसंत साळवे भूषवतील तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असतील. याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक स्वप्निल पवार, संतोष संखद आणि मेघानंद जाधव यांचा “संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार” हा आंबेडकरी जलसा सादर होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Breaking News : दौंड येथील एका पत्रकारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; ससून रुग्णालयात उपचार सुरु