पुणे प्राईम न्यूज डेस्क: जेव्हा रणबीर आणि आलियाची मैत्री झाली, तेव्हा करण जोहरने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अंदाज लावला होता. याबाबत आलियाने नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये याचा खुलासा केला आहे. नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोच्या दुसरा सीझन दर शनिवारी परत आला आहे, आणि ‘जिगरा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टॅलेंटेड कलाकारांसोबत नवीन सीझनची सुरुवात झाली आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, करण जोहर, वेदांग रैना आणि दिग्दर्शक वासन बाला सहभागी झाले होते.
कपिल शर्मा हा करण जोहरला म्हणाला, काही लोक असे मानतात की, तुम्ही इंडस्ट्रीत मॅरेज ब्युरो चालवता. हे ऐकून करण म्हणाला, मी अनेक लोकांना प्रेम मिळवून देण्यात मदत केली आहे, आणि आज त्याचं लग्नही झालंय. तर आलिया भट्ट म्हणाली, रिलेशनशिपच्या बाबतीत करणकडे सिक्स्थ सेंस आहे. जेव्हा मी रणबीरसोबत पहिल्यांदा मैत्री केली तेव्हा करणने अंदाज लावला होता की, आम्ही एक चांगले कपल बनू.