Anant -Radhika Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यावेळी देशभरातील नामवंत व्यक्ती, उद्योजक, सेलिब्रिटी या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत.
त्यात जगप्रसिद्ध गायक, पॉपस्टार जस्टिन बीबर भारतात आला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जस्टिन गाणार आहे. रिपोर्टनुसार, लग्नात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन बिबर याने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. हा कार्यक्रम आज शुक्रवारी (5 जुलै) पार पडणार आहे. शुक्रवारी मुंबई विमानतळावर पापाराझींनी जस्टिन बीबरचे फोटो आणि व्हिडीओ काढले; जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
जस्टिन बीबर याची कामाईचं मुख्य माध्यम कॉन्सर्टच आहे. जस्टिन बीबर याच्या एका कॉन्सर्चची फी 20 कोटी रुपये आहे. आता सर्वांचं लक्ष अनंद अंबानी यांच्या लग्नात होणाऱ्या जस्टिन बीबर याच्या कॉन्सर्टकडे आहे.