मुंबई: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने आपल्या ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शो साठी यास आयलंड अबुधाबीशी भागीदारी केली आहे. या अनोख्या इंटिग्रेशनमुळे लोकांशी वेगळ्या प्रकारे जोडण्याच्या अनेक शक्यता या दोन्ही ब्रॅंडसाठी खुल्या झाल्या आहेत. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि यास आयलंड यांच्यातील भागीदारीमुळे लोकांना या शोमध्ये विविध आकर्षक सहयोग दिसून येईल आणि वेधक अनुभव येईल. तसेच यातून ब्रॅंडेड कंटेंटची एक वेगळी परिभाषा तयार होणार आहे.
या इंटिग्रेशनच्या पहिल्या टप्प्यात परीक्षक फराह खान आणि मलाइका अरोरा तसेच होस्ट ऋत्विक धनजानी आणि गौहर खान यांनी यास आयलंडच्या नयनरम्य स्थळांना भेट दिली आणि आकर्षक कॅप्सुल तयार केल्या ज्यातून यास आयलंडचे त्यांना आलेले काही सुंदर अनुभव प्रदर्शित झाले. दुसऱ्या टप्प्यात या शोचा विजेता आणि कोरिओग्राफर यांना आणखी एका त्यांच्या प्रिय व्यक्तीसह यास आयलंडचा दौरा करता येणार आहे. कोणताही खर्च केल्याशिवाय त्यांना येथील थ्रिल आणि साहस अनुभवता येणार आहे.
या भागीदारीतून पारंपरिक मनोरंजन फॉरमॅटच्या कक्षा वाढवत नेण्याची आणि कथाकथनाचे तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे नवनवीन मार्ग धुंडाळण्याची सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनची वचनबद्धता दिसून येते. यास आयलंडच्या अनोख्या ऑफरिंग्जचा लाभ घेताना ही वाहिनी त्या प्रांतातील लोकांना आकर्षित करू शकते. ही दोन्ही पॉवरहाऊस एकत्र मिळून मनोरंजनाच्या भविष्याला आकार देऊ शकतात. तसे करताना उत्कृष्टता आणि इनोव्हेशनची नवी मानके ते स्थापित करतील.
‘झलक दिखला जा’ची परीक्षक
यास आयलंड अबुधाबी हे विश्राम, मनोरंजन, साहस आणि अखंड मौज यांचे प्रतीक आहे. आमच्या दौऱ्यादरम्यान आम्ही पुरस्कार-विजेता थीम पार्क्स आणि इतर आकर्षक स्थळांना भेट दिली आणि अशा आठवणी निर्माण केल्या, ज्या नेहमी आमच्या सोबत राहतील. आता आम्ही ‘झलक दिखला जा’च्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज झालो आहोत. मला आनंद वाटतो की, यातील विजेत्यांना अबुधाबी येथील यास आयलंडचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे, जे आत्ता जगातील विश्राम आणि मनोरंजनाच्या दृष्टीने एक आघाडीचे डेस्टिनेशन आहे. आमचे सेलिब्रिटी स्पर्धक आणि कोरिओग्राफर यांनी केलेले परिश्रम, त्यांचे पॅशन आणि त्यांची निष्ठा याबद्दल त्यांना मिळालेला हा पुरस्कार असेल!
‘झलक दिखला जा’ची चुरस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचली असून चढाओढ अधिक तीव्र झाली आहे. एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्ससह ग्रँड फिनाले हा एक अविस्मरणीय इव्हेंट होणार आहे.