Info In Short : पुणे : बँक एटीएममधून फाटक्या नोटा मिळाल्या तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएममधून निघालेल्या फाटलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नियम केले आहेत आणि त्यासाठी कोणते चार्जही आकारले जाणार नाही. (If you get torn notes from a bank ATM, do ‘this’ thing)
अशा बदलून घ्या फाटक्या नोटा
एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून नोटा बाहेर आल्या त्या बँकेत जावे लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ज लिहावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ, ठिकाण याची माहिती लिहावी लागेल. (Info In Short) अर्जासोबत एटीएममधून ट्रांझेक्शन संबंधित मिळालेली स्लिपही जोडावी लागेल. जर स्लिप जारी केली नसेल, तर मोबाईलवर मिळालेला ट्रांझेक्शनचे डिटेल्स द्यावे लागतील. यानंतर तुमच्या नोटा बँकेद्वारे बदलल्या जातील.
तर बँकांना होणार दंड
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, एटीएममधून खराब किंवा बनावट नोट बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल.बँकांनी खराब नोटा बदलून घेण्यास नकार दिला तर त्यांना १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. (Info In Short) हा नियम सर्व बँक शाखांना लागू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात
Pune ZP News : काम नाकारणार्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषदेचा इशारा