Sur Nava Dhyas Nava : कलर्स मराठीवर ‘सूर नवा ध्यास नवा’चं हे पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आलं होतं. तीन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर नुकताच या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या महाअंतिम सोहळ्यात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजयी ठरला. स्पर्धेतील उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्याच गायकांनी आपल्या सुंदर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. अंतिम भागात स्पर्धकांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित व त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने असे दिग्गज कलाकार आले होते.
गोपाळ गावंडे याला महागायक होण्याचा मान मिळाला. अकोल्या जिल्ह्यातील छोट्याश्या गावातून आलेल्या गोपाळनं अभिमानास्पद कामगिरी केली. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला आहे.
स्पर्धक म्हणून सहभागी झालो, पण विजेता होईल, असं मला वाटलं नाही : गोपाल गावंडे
सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या कार्यक्रमात मी स्पर्धक म्हणून सहभागी झालो होतो. पण या पर्वाचा मी विजेता होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. हा ३ महिन्यांचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. आता हा प्रवास पुन्हा मिळणार नाही, याची खंत कायम राहिल. या प्रवासात मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. असं गोपाल गावंडे म्हणाला.