(Gautami Patil) मुंबई : शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा माॅर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले होते. त्यानंतर पोलिसांना संशियित आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाई नंतर तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. अशात ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी यावरून मोठे वक्तव्य केले आहे.
मग ‘ती’ तुमची बहीण नाही का?
गौतमी पाटील Gautami Patil ) यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मग ती तुमची बहीण नाही का? शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली. असे प्रश्न उपस्थित करत, मग गौतमी तुमच्या भगिनी नाहीत का? यांना इज्जत नाही का?, असे ते म्हणाले. शीतल म्हात्रेप्रमाणे नृत्यांगना फेम गौतमी पाटील हिच्याही व्हिडिओची एसआयटी चौकशी करा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे.
दरम्यान, गौतमी पाटील यांचा कपडे बदलानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच याप्रकरणी राज्य महिला आयोगाने दाखल घेतली होती. आता पुन्हा शीत म्हात्रे यांच्या कथीत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची पुन्हा विषय चर्चेला आला आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार पाहावे लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा : गाण्यावरून दोन गट भिडले : पोलिसांची अखेर मध्यस्थी!
नृत्यांगणा गौतमी पाटीलचा ; खान्देश कन्या; म्हणून गौरव या नेत्याचे मानले आभार!