(Gautami Patill )पुणे : गौतमी पाटीलच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते, पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही फक्त ५ हजार रुपये वाढवून मागितले तर आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप करतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिले जाते. आम्हाला संरक्षण नसते, अशी टीका इंदुरीकर महाराजांनी गौतमीवर केली होती. त्यावर गौतमी काय उत्तर देणार याकडे गौतमीच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखरे गौतमीने प्रत्युत्तर दिले आहे.
इंदुरीकर महाराजांच्या टीकेला गौतमी पाटीलने उत्तर…!!
इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील उत्तर देताना म्हणाली की, ”इंदुरीकर हे एक महाराज आहेत, त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. तसेच इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं.” मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. मला तीन गाण्यासाठी कोणीही तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्टपणे सांगितले आहे.
आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. असेही गौतमीने सांगितले आहे.
गौतमीने दिलेल्या उत्तरामुळे ती नेमके किती मानधन घेत हे गुलदस्त्यातच आहे. पण आयोजकांनी सुस्कारा नक्कीच टाकला असणार आहे. गौतमीच्या कार्यक्रमांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आयोजकांना तिचे कार्यक्रम घेण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ येत आहे. गौतमी चांगलीच प्रसिध्दीच्या झौतात आली आहे. तरुणाईवर तिने चांगली जादू केली आहे. तिच्या आदांवर फिदा होणार लाखो चाहते तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Gautami Patil : गौतमी पाटीलवर सुरेखा पुणेकर यांनी साधला निशाणा ;;अंगभर कपडे घालून लावणी सादर करावी..
Gautami Patil : खर्शी तर्फ कुडाळमध्ये आजीच्या पप्पीने भारावली गौतमी पाटील
Gautami Patil News : गौतमी पाटीलचा;हाय झुमका वाली पोरं; गाण्यावर हटके ठुमका, हा डान्स एकदा बघाच