पुणे :‘कलर्स मराठी’वरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या “युद्ध कॅप्टन्सीचे” हा कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. त्यासाठीच सदस्य रणनीती आखत आहेत. टास्कमध्ये कसे समोरच्या टीमला हरवता येईल? प्रसाद, तेजस्विनी आणि अमृता देशमुख तर दुसरीकडे समृद्धी, अक्षय आणि रोहित आहेत. ते अटॅक नाहीच करणार कारण त्यांच्याकडे शून्य आहे, असे अक्षयचे म्हणणे आहे.
बिग बॉसच्या घरात दररोज सदस्यांना नवनवीन धक्के मिळत असतात. आता या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नव्हे तर तब्बल चार वाईल्ड एन्ट्री होणार आहेत. आता हे चार सदस्य कोण असतील? ते घरात कधी एन्ट्री घेतील? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये घरात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा बिग बॉस करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या येणाऱ्या भागात शनिवार व रविवारी चार सदस्य वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणार आहेत.
गुरुवारी अपूर्वा कॅप्टन्सी कार्यातून बाद झाली. रोहित आणि तेजस्विनी या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले. आता कोण जिंकणार कॅप्टन्सी टास्क ? कोण बनणार कॅप्टन हे आजच्या भागात कळणार आहे. तर, बिग बॉस यांनी वारंवार ताकीद देऊन देखील सदस्य उत्साहाच्या भरात आक्रमक होत आहेत. आक्रमकतेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे विकास आणि रोहित बिग बॉसच्या दंडास पात्र ठरले. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत जेलमध्ये राहण्यास सांगितले आहे.