Film News : नवी दिल्ली : मनोरंजन विश्वातील सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘जेलर’ आता अडचणीत सापडला असून, या चित्रपटाचे शीर्षक वादाचे कारण ठरले आहे. एका मल्याळम चित्रपट निर्मात्याने या चित्रपटाचे नाव बदलले जावे, अशी मागणी केली आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्या चित्रपटाचे नाव इतर राज्यात नाही तर किमान केरळमध्ये तरी बदलले जावे, अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर, हे आपल्या चित्रपटाचे शीर्षक असून, ते ‘जेलर’च्या निर्मात्यांनी चोरले असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
‘जेलर’मधील रजनीकांतच्या व्यक्तिरेखेकडून लोकांना खूप अपेक्षा….
मल्याळम निर्मात्याच्या दाव्यानुसार, त्याने या चित्रपटाच्या नावाची नोंद आधीच केली असून, केरळमध्ये या चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे यासाठी तो कोर्टात जाणार आहे. रजनीकांत त्यांच्या या आगामी ‘जेलर’ चित्रपटात जेलरची भूमिका साकारताना दिसणाऱ आहेत. त्यांच्या या भूमिकेबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आतापर्यंत संबंधित सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवून सस्पेन्स तयार ठेवण्यात आला आहे. तर, ‘जेलर’मधील रजनीकांतच्या व्यक्तिरेखेकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. (Film News)
‘जेलर’ या चित्रपटाचे नाव बदलण्यावरून केरळमध्ये आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एकीकडे रजनीकांत यांचा ‘जेलर’ प्रदर्शित होत असताना, दुसरीकडे त्याच नावाचा आणखी एक मल्याळम चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे. (Film News) ‘जेलर’ नावाच्या मल्याळम चित्रपटात अभिनेता ध्यान श्रीनिवासन झळकणार आहे. त्याचा हा चित्रपट एक पीरियड थ्रिलरवर ड्रामा असणार आहे. साकीर माथिल आणि एनके मोहम्मद या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.