Film News : डोक्यात विषय यायला तसे काही निमित्त लागत नाही. कधीही केव्हा उस्फूर्तपणे एखादी कथा सुचते आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यावर चित्रपट तयार होतो. क्रिकेट या विषयावर निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी अद्याप पिच्छा सोडलेला नाही. अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात क्रिकेट हा विषय हाताळलेला आहे आणि आता आर. माधवन या अभिनेत्याच्या ‘टेस्ट’ चित्रपटाची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. Film News
प्रेक्षकांची हृदय आणि मने जिंकली
जो क्रिकेट या विषयावर आधारित आहे. ‘रहना है तेरे दिल में’ ते ‘तनु वेड्स मनू’ अशी वाटचाल करताना माधवने ‘रॉकेटरी : द नबी इफेक्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. माधवन हा एक अफलातून अभिनय करणारा अभिनेता आहे. पडद्यावर उत्तम केमिस्ट्री जुळवून काम करून सातत्याने त्याने प्रेक्षकांची हृदय आणि मने जिंकली आहेत. Film News
अनेक दशके त्याने विविध भाषांमध्ये पसरलेल्या वैविध्यपूर्ण फिल्मोग्राफीसह अभिनयातून उत्तम काम केले आहे. ‘रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधील त्याचे अभिनायचे बारकावे जपत त्याने कायम उत्तम काम केले आहे. सहकलाकारांसोबत तो एकरूप झालेला दिसतो. ‘रेहना है तेरे दिल में’ मधील दिया मिर्झा सोबतची मनमोहक केमिस्ट्री असो, ‘तनु वे मनू’ मधील कंगना सोबत शेअर केलेली स्क्रीन असो किंवा ‘अलई पयुथे’मधील शालिनीसोबत शेअर केलेली भावनिक परिस्थिती असो त्याची केमिस्ट्री नेहमीच लक्षवेधी ठरली आहे.
ऑन-स्क्रीन हिरो म्हणून त्यांचा वारसा भारतीय चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. हा अभिनेता लवकरच शशिकांतच्या आगामी क्रिकेट ‘ड्रामा’मध्ये दिसणार असून नयनतारा, सिद्धार्थ आणि मीरा जास्मिन यांच्यासोबत टेस्टमध्ये दिसणार आहे. भारतात ज्या टेस्ट मॅच घेतले जातात त्यावर हा चित्रपट आधारित आहे. Film News