Film News : आपल्या दमदार आवाजाने मनाला भुरळ घालणारे गायक कैलाश खेर यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मग ते ‘अल्लाह के बंदे’ असो शिवतांडवस्त्रोत्र कैलाश खेर यांनी जवळपास सगळ्याच प्रकारची गाणी गायली. कैलाश खेर यांनी आपल्या गाण्यांनी इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. पण, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कैलाश खेर यांनी मुंबईत अत्यंत गरिबीत दिवस घालवले. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.(Film News)
गायक कैलाश खेर यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
कैलाश खेर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात झाला. त्यांना संगीताचा वारसा कुटुंबाकडूनच मिळाला. त्यांचे वडील पंडित मेहरसिंह खेर हे पुजारी होते आणि घरातील कार्यक्रमात ते अनेकदा पारंपारिक लोकगीते म्हणत असत. कैलाश खेर यांनी बालपणीच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. आजघडीला कैलाश खेर यांनी आपल्या गायनाने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले असेल. परंतु, त्यांच्या यशामागे निराशा आणि कठोर संघर्ष आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर कैलाश खेर आतून इतके तुटले होते की, त्यांना जगण्याची आशाच उरली नव्हती.(Film News)
चौथ्या वर्षापासून गाणं शिकणाऱ्या कैलाश यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी गुरूच्या शोधात घर सोडले. कैलाश खेर यांना शास्त्रीय आणि लोकसंगीताचा अभ्यास करायचा होता. त्यांनी दिल्लीतील एका संगीत वर्गात प्रवेश घेतला. संध्याकाळच्या शिफ्टमध्ये ते मुलांना संगीत शिकवत. संगीत भारती, गांधर्व महाविद्यालय यांसारख्या संस्थांमधून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.(Film News)
‘रब्बा इश्क ना होवे’ आणि ‘अल्ला के बंदे हंस दे..’ या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या कैलाश खेर यांनी अल्पावधीतच आपली छाप उमटवली.(Film News)