Entertainment News : मुंबई : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्या या जगात नसल्या तरी त्यांच्या कामाचे नाव अजूनही काढले जाते. भारताच्या थोर समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याती होती. स्वतःच्या पोटच्या लेकराला दुसरीकडे ठेवून त्या नेहमीच अनाथ मुलांसाठी झटल्या. त्यांच्यासाठी प्रसंगी त्यांनी भिकही मागितली. हा सर्व प्रवास उलगडणारी मालिका ‘सिंधूताई सपकाळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कलर्स मराठीवर होणार प्रदर्शित
सिंधूताईंनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला होता. कुटुंबाने वाऱ्यावर सोडले असताना त्यांनी इतर वाऱ्यावर सोडलेल्या लेकरांना मायेचे छप्पर दिले. त्यांचे संगोपन केले. (Entertainment News) त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांना मदत करण्यात व्यतीत केले होते. त्यांनी एकूण १०५० अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांच्या कुटुंबात २०७ जावई आणि ३६ सूना तर जवळपास १००० नातवंडे आहेत. त्यांची स्वतःची मुलगी एक वकील आहे. त्यांनी मोठ्या संख्येने अनाथ मुलांना दत्तक घेतले जे आता डॉक्टर, इंजिनियर आणि वकील अशा पदावर पोहचले आहेत. या थोर सिंधूताईंच्या आयुष्यावर मध्यंतरी चित्रपट देखील आला होता. त्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने माईंची भूमिका साकारली होती.
आता त्यांच्या आयुष्यावर एक मालिका देखील येत आहे. ‘सिंधूताई माझी माई’ ही मालिका येत्या १५ ऑगस्टपासून कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आमच्यावर टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाय… सुप्रिया सुळेंचा सज्जड दम!