(Entertainment News ) पुणे : ‘कोंबडी पळाली’ या मराठी गाण्यावर थिरकणारी मराठी अभिनेत्री महाराष्टातील प्रेक्षकांना चांगलीच माहिती आहे. तिच्या अदांनी प्रेक्षकांना चांगलेच घायाळ केले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर अलिकडेच क्रांतीने प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’या टॉक शोमध्ये भाग घेतला होता, त्यात तिने मोठा खुलासा केला आहे.
आर्यन खान ड्रग्न प्रकरणाचा देशभर गाजावाजा…!
क्रांती ही सोशल माध्यमांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. दोन वर्षांपुर्वी आर्यन खान ड्रग्न प्रकरणाचा देशभर गाजावाजा झाला होता, त्यामुळे राजकारणही पेटलं होते. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर तऱ्हेतऱ्हेचे आरोप करण्यात आले होते. यावर या कार्यक्रमात क्रांतीने मोठा खुलासा केला आहे.
या कार्यक्रमात क्रांती म्हणाली की, “अंडरवर्ल्ड आणि वेडे चाहते या दोन गोष्टींपासून सगळ्यात जास्त धोका असतो?. ड्रग्ज आणि अंडरवर्ल्डचा थेट संबंध असल्याने ते कुणाचा घर-परिवारसुद्धा बघत नाहीत. ते तुम्हाला डायरेक्ट संपवतात. दुसरी भीती वेड्या चाहत्यांकडून असते. ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही उभे आहात, ती मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे हे भय मी रोज जगते आहे. माझ्या इन्स्टाग्राममध्ये नुसते धमक्यांचे मेसेज आहेत. तुम्हाला जाळून टाकू, तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू, असे मेसेज मला येतात” असे ती म्हणाली आहे. पटलं तर या कार्यक्रमाचा प्रोमो आला आहे. या कार्यक्रमात तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satish Kaushik Death : दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर!
Entertainment News : अभिनेता आकाश कुंभारचे गडद अंधार; चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण
Womens Day Special : वडूज नगरीत रंगला खेळ पैठणीचा