Entertainment news : मुंबई : ‘वागले की दुनिया-नई पिढी, नये किस्से’ ही सोनी सबवरील एक विचार करायला लावणारी कौटुंबिक मालिका आहे. त्यातून सामान्य लोकांचे आयुष्य आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ही मालिका आपल्या कथानकातून करत असते. त्यातील पात्रे आपल्याशी साधर्म्य साधतात. आयुष्यभराचे धडे देतात.
स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती
या मालिकेत एका नाजूक विषयात हात घालण्यात आला आहे. स्तनाचा कर्करोग म्हटल्यानंतर आजारी व्यक्ती आणि घरातले सदस्य या रोगाविषयी मोकळेपणाने संवाद साधत नाहीत. त्यामुळे आजार बळवतो आणि मृत्यूशिवाय पर्याय राहत नाही. (Entertainment news ) या मालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे या विषयावर प्रकाश झोत टाकण्याचा. या विषयावर मार्गदर्शन करायचे ठरवलेले आहे. कथानकाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केल्याने, जनजागृती होईल आणि आजारी व्यक्तीमध्ये असलेले दडपण कमी होईल.
या हृदयस्पर्शी मालिकेत वंदनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिवा प्रणतीने आपल्या पात्राच्या स्तनाच्या कर्करोगाच्या निदानाविषयी, संघर्षाबाबत विचार व्यक्त केले. (Entertainment news ) तीच या मालिकेत कर्करोगबाधित व्यक्तिरेखा साकारत आहे. बऱ्याचशा महिला आजाराविषयी मनमोकळेपणाने बोलत नाही. संकोच करतात तसे न करता महिलांनी पुढे यायला हवे असा संदेश या मालिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.