मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात छापेमारीनंतर राज कुंद्रा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. राज कुंद्रा यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी राज कुंद्रा यांच्या संबंधित अनेक ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या.
पॉर्नोग्राफी आणि ॲडल्ट फिल्म्सच्या चित्रीकरणासंबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शनिवारी राज कुंद्रा यांना समन्स बजावले. यापूर्वी ईडीने मुंबई आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये जवळपास 15 ठिकाणी छापे टाकले होते. यात राज कुंद्राच्याही कार्यलयांचा आणि घराचा समावेश होता.
राज कुंद्रा यांच्यावर आरोप असलेले पोर्नोग्राफी प्रकरण हे दोन वर्षापूर्वीचे आहे. 2022 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणात पत्नी शिल्पाचे नाव आल्याने राज कुंद्रा संतापले होते पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचे नाव समोर आल्यावर राज कुंद्राने वक्तव्य केले होते. पत्नीचे नाव वारंवार ओढणे खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले होते. राज कुंद्राने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली होती