पुणे : हिंदी चित्रपटांविरोधात मागील अनेक दिवसांपासून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडमधील येणाऱ्या कोणत्याना कोणत्यातरी चित्रपटाला विरोध केला जात आहे. बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. दररोज एक ना एक चित्रपट आणि कलाकार यांच्या विरोधात बहिष्काराचा ट्रेंड चालवला जातो.
नुकत्याच काही दिवसांपासून आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रचंड विरोध केला जात आहे. आता यादरम्यान, अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील शाहरूख आणि दीपिकाचा लूक समोर आला होता. परंतु सध्या ट्वीटरवर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
‘लाल सिंह चड्ढा’ आणि त्यांच्या आगामी चित्रपटांना पाठिंबा देणाऱ्या कलाकारांवर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. आता असेच काहीसे हृतिक रोशन स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटासोबत घडत आहे. कारण, शनिवारी ‘लाल सिंह चड्ढा’ पाहण्यासाठी हृतिक रोशन थिएटरमध्ये गेला होता. त्याने आमिरच्या चित्रपटाच्या समर्थनार्थ ट्विट करत सर्वांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. हृतिकच्या या ट्विटने आता त्याच्यावर छाया पडल्याचे दिसत आहे.
आमिर खानचा लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतरही सोशल मीडियावर त्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता ट्रोलर्स शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावर देखील बहिष्कार टाकायला सुरूवात केली आहे. आता ट्वीटरवर पठाण चित्रपटावरील बहिष्कार ट्रेंड होत आहे. त्यामुळे पठाण प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटासाठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु या चित्रपटावर बहिष्कार का टाकला जात आहे याचं कारण अजून समोर आलं नाही.