मुंबई: ‘बिग बॉस 17’ च्या (Bigg Boss 17) लेटेस्ट एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन वेगवेगळ्या घरात विभागले जाणार आहेत. ‘दिल, मन और दम’च्या घरात राहणाऱ्या सदस्यांच्या बदलाची घोषणा ‘बिग बॉस’ने केली.
विकी अंकितापासून विभक्त होतो आणि त्याच्या पालकांच्या घरात राहतो, ज्यामुळे अंकिता खूप अस्वस्थ होते. अंकिताला अस्वस्थ पाहून बिग बॉसनेही विचारणा केली. शोच्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता लोखंडेला राग आल्याचे पाहायला मिळाले. यामध्येच ती विकीला ‘तू खूप स्वार्थी असल्याचे म्हणत मूर्ख म्हटले. तुझ्यासोबत राहून मला खरंच वेड लागलंय. आपण विवाहित आहोत हे विसरून जा. आजपासून तू वेगळा, मी वेगळी’, असेही तिने म्हटले आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात दुसऱ्या दिवसापासून मतभेद असल्याचे पाहिला मिळाले. दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले. मात्र, दुसऱ्याशी भांडण किंवा वाद झाला तर दोघेही एकमेकांना साथ देतात. पण अलीकडच्या काळात दोघांमध्ये मतभेद आणि गैरसमजही पाहायला मिळत आहेत. त्यातूनच ते दोघे वेगळे होताना पाहिला मिळणार आहे.