पुणे : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. आलियाने आज (६ नोव्हेंबर) गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आज सकाळी ७.३० वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले होते. ते पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीही समोर येत होती. त्यानंतर अखेर गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलियाने तिच्या बाळाला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. ते दोघेही सातत्याने चर्चेत होते. कपूर कुटुंबात येणाऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते.तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.