मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बेस्ट बसने मागून धडक दिली. ही घटना मुंबईत घडली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. तसेच तिच्या कारचेही कोणतेही नुकसान झाले नाही. ही घटना 26 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली.
या संबंधी एक व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे. जुहूमध्ये एका मोठ्या लाल रंगाच्या बेस्ट बसने ऐश्वर्याच्या कारला मागून धडक दिल्याचे या व्हीडीओमध्ये दिसत आहे. यानंतर ऐश्वर्याचा बॉडीगार्ड कारमधून बाहेर येतो. मात्र, ऐश्वर्याच्या कारचे नुकसान झालेले नाही.