मुंबई : खिलाडी अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन राणीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ या सिनेमाची प्रतिक्षा संपली आहे. कारण हा सिनेमा येत्या शुक्रवारी 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. पूजा एंटरटेनमेंट निर्मित हा सिनेमा असणार आहे. अक्षय कुमारचा 2023 मधील हा शेवटचा सिनेमा असेल, असे सांगितले जात आहे.
OMG 2 ला मिळालेल्या चांगल्या यशानंतर प्रेक्षकांनी अक्षय कुमारच्या अभिनयाचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या स्क्रिप्ट निवडीचेही कौतुक केले आहे. त्याने समाजाला एक आशय वर्चस्व असलेला सिनेमा सादर केला. अक्षय कुमारच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता अक्षय कुमारचा या वर्षातील शेवटचा सिनेमा असणार आहे.
सिंग इज किंग, सिंग इज ब्लिंग, केसरी आणि आता मिशन राणीगंजमध्ये चौथ्यांदा पगडीतील त्याची भूमिका असणार आहे. अक्षय कुमारला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर निर्मित ‘मिशन राणीगंज’चे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई यांनी केले आहे. आता हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.