पुणे : राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेतर्फे (एनआयओएस) दहावी (माध्यमिक)-बारावीची (उच्च माध्यमिक) परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येत असते. एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जातया असते. त्यानुसार दहावी-बारावीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी लेखी परीक्षा २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
महाराष्ट्रासह गोव्यातील नियोजित परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना ‘https://sdmis.nios.ac.in’ या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहेत, अशी माहिती ‘एनआयओएस’च्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक बिपन महारा यांनी दिली आहे.