सागर घरत
करमाळा : करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथील राजेंद्र कांतीलाल देशमुख यांचा मुलगा महेश राजेंद्र देशमुख याने राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक पदी (STI) घवघवीत यश मिळवले.
कुंभारगाव सारख्या छोट्याशा खेडेगावातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन या पदापर्यंत पोहोचणारा तो गावातील पहिलाच अधिकारी झाला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील महेशने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
या यशामागे त्याचे वडील राजेंद्र देशमुख यांचे परिश्रम आहेत. तसेच त्याने अभ्यासात ठेवलेली सातत्य, चिकाटी, जिद्द यांच्या जोरावरती यशाला गवसणी घातली आहे.
घरची परिस्थिती बेताची असून देखील त्यांनी भाजीपाला विकत आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले व त्याच कष्टाची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास करून शेवटी महेशने यशाच्या शिखराला गवसणी घातली.
या यशाबद्दल कुंभारगावातील गावकऱ्यांनी उत्साहात जोरदार स्वागत केले.