राहुलकुमार अवचट
यवत : मिरवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील नौशाद रजिद शेख या विद्यार्थ्याने दौंड तालुक्यात यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव या स्पर्धेत थाळीफेक व गोळा फेक या स्पर्धेत विशेष कामगिरी करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याच्या या यशाचा कौतुक व त्याच्या पाठीवरती कौतुकाचे थाप पडावी या उद्देशाने प्राथमिक शाळा मिरवडी व ग्रामपंचायत मिरवडी यांच्या वतीने त्याचा व त्याला मार्गदर्शन करणारे कुंजीर सर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
आनंदाची बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील दोन्ही प्राथमिक शाळांना प्रत्येकी तीन लाख रुपये किमतीचे साहित्य ग्रामपंचायत मिरवडीच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आले होते आणि त्या साधनांच्या जोरावरती या विद्यार्थ्याने विशेष यश संपादन केले याचा आनंद विद्यार्थी त्याचे शिक्षक यांच्या ग्रामपंचायत कार्यकारणी व संपूर्ण मिरवडी ग्रामस्थांना आहे.
यावेळी नौशादला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी गावातील आजी-माजी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.