लोणी काळभोर, (पुणे) : शिवाजीनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे ने सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले असल्याची माहिती कुंजीरवाडीचे उपसरपंच चंद्रकांत मेमाणे यांनी दिली.
कुंजीरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरसाठी १३ विद्यार्थी व ७ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या शिबिराची सुरुवात पहाटे पाच वाजल्यापासून होत होती. यामध्ये दिवसभर जनजागृतीवर कार्यक्रम (पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा, निर्मलुन व्यसनमुक्ती, हेल्थ कैम्प, श्रमदान, आरोग्यविषयी सर्व माहीती व विविध कार्यक्रम राबविण्यात येत होते. तसेच विविध वैचारिक, मैदानी, समाजातील विविध विषयांवर चर्चा सत्र होऊन रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास याचा कार्यकाल समाप्त होत होता. सात दिवस हे शिबीर घेण्यात आले.
याची शिबिराची सांगता रविवारी (ता. १३) करण्यात आली. यावेळी कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड, उपसरपंच चंद्रकांत मेमाने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापू घुले, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भी. उगले यांचे मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती रोसामा बेसिल, उपप्राचार्य श्रीमती स अँजेला ब्रेवर, शिक्षक वसुदेव माने व शिक्षिका पुनम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना शिवीर यशस्वीरीत्या पार पाडला.