Shirur News शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थेच्या सह सचीव माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. (Shirur News)
येथील विद्यालयात एकूण २२ विद्यार्थी आठवी च्या शिष्यवृत्ती परिक्षेत बसविण्यात आले होते. त्यापैकी १६ विद्यार्थी पात्र ठरले असून सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. याप्रसंगी उद्योजक सचिन विश्वासे, शांताराम उचाळे,प्राचार्य आर.बी.गावडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,गुणवंत विद्यार्थांचे आई-वडील उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनिता गावडे म्हणाल्या कि, सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी ठरत आहेत. त्यामागे त्यांच्या प्राथमिक शिक्षणातील दर्जा सुधारणेचे काम महत्वाचे मानले जाते. प्राथमिक शिक्षणात ग्रामिण भागातील विद्यार्थ्याचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले श्रेय महत्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग सारख्या परिक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी झळकू लागले आहेत. पोलिस भरतीत देखील खेड्यातील मुले कष्ट करून यशस्वी होताना दिसू लागली आहेत. त्यासाठी शिक्षकांनी देखील शिक्षणाचा दर्जा अजून सुधारावा. असे गावडे यांनी यावेळी व्य़क्त केले आहे.
आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत सई राजू वराळ ( गुण 252 ), आदित्य रामदास किऱ्हे ( गुण-226 ), सुप्रिया नानाभाऊ दिवेकर ( गुण-220 ), धनश्री सुनिल उचाळे ( गुण-212 ), आदित्य मच्छिंद्र चासकर ( गुण 208 ), रिद्धी अनिल दुडे ( गुण -202 ), आदित्य सुनिल कुळकुंभे ( गुण -200 ) मिळवून यशस्वी झाले आहे.
दरम्यान, या यशस्वी विद्यार्थ्यांना कोंडीभाऊ चौधरी, बरकले मॅडम, महेंद्र गायकवाड, संजय वाघमारे , आर.एम्.गावडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.बी गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निचित यांनी केले.