Teacher News : नवी दिल्ली : तुम्ही देखील शिक्षक असाल तर तुमच्यासाठी ही आहे महत्वाची बातमी. तुम्हाला ब्रिटनच्या शाळांमध्ये शिकवण्याची संधी मिळू शकते. (Teacher News )कारण ब्रिटनमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता आहे. (Teacher News )
आता भारतीय शिक्षकांना परदेशात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे.
एका हिंदी वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये यावर्षी सुमारे 40 हजार शिक्षकांनी नोकरी सोडली आहे. शिक्षण व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतीय शिक्षकांसाठी नोकऱ्यांची दारे खुली केली आहेत. यासाठी शिक्षकांना दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्यासाठी 10 लाख रुपये एकरकमी दिले जात आहेत.(New Delhi)
सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नव्या सत्रात इंग्रजीसह विज्ञान आणि गणित विषयाच्या तीन हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे. इंटरनॅशनल रिलोकेशन पेमेंट स्कीम अंतर्गत, भारतीय शिक्षकांना पगार म्हणून दरमहा 2.5 लाख रुपये आणि सुमारे 10 लाख रुपये एकरकमी मिळतील. रिलोकेशन पेमेंटमध्ये शिक्षकांचे व्हिसा फी, इमिग्रेशन हेल्थ अधिभार आणि इतर पुनर्स्थापना-संबंधित खर्च समाविष्ट असतील. शाळांकडून नोकरीचे ऑफर लेटर असल्यास शिक्षकांना आउट-ऑफ-टर्न वर्क व्हिसाही मिळेल.(New Delhi)
सध्या एका वर्षासाठी योजना
ब्रिटनच्या शिक्षण मंत्रालयाला विश्वास वाटतो की, भारतातून चांगले शिक्षक ब्रिटनमध्ये येतील. शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील शाळांचे वर्ग घ्यावे लागतील. सध्या ही योजना केवळ एक वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.(New Delhi)