राजेंद्रकुमार शेळके
Swimming is a good exercise : जुन्नर : निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या,आधुनिक तीर्थक्षेत्रांच्या मखरात वसलेला व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या घोडेगाव फाट्याजवळील हॉटेल सेव्हन रेजमध्ये उन्हाळा सुट्टी निमित्त खास लहान मुलांसाठी पोहण्याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अगदी ३ वर्षापासून ते ८० वयोगटापर्यंत सर्वांनाच पोहण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. (Swimming is an all round beautiful exercise : Sanjay Bhoir)
खास लहान मुलांसाठी पोहण्याचे प्रशिक्षण
हॉटेल सेवन रेजमधील जलतरण तलावाचे मुख्य संचालक संजय भोईर व त्यांचे सहकारी प्रशिक्षक पद्माकर औटी, दिपा चव्हाण यानी या लहान मुलांना पाण्याची भीती मनात न बाळगता अगदी सहज सुलभ पध्यतीने या विद्यार्थ्यांमध्ये पाण्याची व पोहण्याची आवड निर्माण केली जात असल्याने पालकवर्ग अगदी आनंदाने आपल्या पाल्यास त्यांच्या हवाली करून बिनधास्त आहेत. (Swimming is a good exercise) अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने पोहण्याची कला तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या टेकनिक्स या विद्यार्थ्यांना दिले जाते.
खरंतर पोहणे ही आज काळाची गरज बनली आहे. आपण कुठल्याही ठिकाणी पर्यटनासाठी जेव्हा बाहेर जातो,तेव्हा अचानकपणे समुद्रकिनारी, नदीमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये अचानक पाय घसरून किंवा धक्का लागून कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता असते. (Swimming is a good exercise) अशावेळी किमान आपल्याला आपला स्वतःचा जीव वाचवता येईल एवढे पोहणे आले म्हणजे आपण खऱ्या अर्थाने पोहण्यास पात्र आहोत असा ठाम विश्वास यावेळी या जलतरण तलावाचे मुख्य प्रशिक्षक संजय भोईर व त्यांचे सहकारी प्रशिक्षक पद्माकर औटी, दिपा चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
जुन्नर व परिसरातील अनेक गावांवरून या ठिकाणी पालक उन्हाळ्याच्या सुट्टीचे निमित्ताने आपल्या पाल्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी घेऊन येत आहेत.(Swimming is a good exercise) विद्यार्थ्यांना पालकांना मुलांना पाण्याची भीती घालून त्यांच्या मनामध्ये पोहण्याची कला व आवड निर्माण करून,एक प्रकारे आपण कुठेतरी यशस्वी झालो याचा आत्मिक आनंद यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. आणि हाच आनंद या प्रशिक्षकांना खूप काही देऊन जातो. ही कला मुलांमध्ये निर्माण होईल माझी खरी गुरुदक्षीणा असेल. प्रथमत या मुलांना पाण्यात पाय कसे मारावे, पाण्यात स्वतःला कसं तरंगून ठेवावं, पाण्यात शरीर कसे असले पाहिजे,फ्लोटच्या मदतीने , कीबोर्डच्या मदतीने या विद्यार्थ्यांना प्रथमतः ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर ती कला अवगत झाल्यावर या मुलांना पाण्याची भीती मनात रहात नाही. (Swimming is a good exercise) जेंव्हा मनापासून कोणाची आवड निर्माण झाली या विद्यार्थ्यांना होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कला अवगत होतात . जातो आणि यातूनच एक चांगले जलतरण पटू केवळ गावातच,राज्यात नाही आपल्या भारतासाठी काहीतरी करू शकेल असा आत्मविश्वास या प्रशिक्षणातून सर्व नवोदित सर्वांना दिली संजय भोईर व त्यांचे सहकारी प्रशिक्षक पद्माकर औटी, दिपा चव्हाण यांनी कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.