दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग (pined that students) समाज परिवर्तनासाठी करावा ( knowledge for social change) असे मत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष (president of Indapur Taluka Shikshan Prasarak Mandal) तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केले.
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आणि डिस्ट्रिक्ट लिनेस क्लबच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान बुधवारी (ता. ०३ ) करण्यात आला. त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला जोपासणाऱ्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आयुष्य, समाज परिपूर्ण करण्यासाठी, देशासाठी काहीतरी करण्यासाठी केला पाहिजे. शिक्षण, ज्ञान याला कर्तुत्व – नेतृत्वाची जोड दिली तर आयुष्यात माणूस यशस्वी होतो. असे मत व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक प्रा. जयश्री गटकुळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय सुरवशे, श्रुतिका सोलापूर यांनी केले. तसेच आभार प्रा.सचिन खरात यांनी मानले.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, संस्थेचे संचालक विलास वाघमोडे, ॲड. कोठारी, डॉ. शिवाजी वीर, लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट सचिव उज्वला गायकवाड, लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट खजिनदार कल्पना भोर,शहा-महादेवनगर लिनेस क्लब अध्यक्षा जयश्री खबाले, रतन पाडुळे, डॉ. एम. पी.शिंदे, डॉ. आर. आर. भोसले, प्रा. मोनिका भुजबळ, प्रा.श्वेता खोपडे, प्रा. प्रशांत साठे, प्रा. उत्तम माने आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Indapur News : अखेर वानर जेरबंद : इंदापूर वनविभाग व रेस्कू टीमच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांना यश
Indapur | बावडा येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्साहात