सोलापूर : Solapur Crime News: आलेगाव खु. (ता. माढा) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिकविण्यासाठी कधीच न आलेला व शाळेशी कोणताही संबध नसताना (teacher without having anything to do with the school) शिक्षकच बनावट (Fake teacher) तयार करून मुख्याध्यापकानेच (principal )साडेतीन लाख रुपयांचा पगार (salary of three and a half lakh rupees) हडपल्याचा (grabbed the salary )धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Crime News:)
बाळासाहेब केचे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेगाव (खु) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाल सध्या २० टक्के अनुदानावर आहे.तर या शाळेवर बाळासाहेब केचे हे मुख्याध्यापक आहेत. दरम्यान, सागर हणमंत नवगण यांचा शाळेशी कोणताही संबंध नसताना त्यांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्सवरून सरस्वती विद्यालयाने सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून २०११ मध्ये मान्यता मिळवली.
नवगण हे सध्या साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल बामणोली, कुडाळ येथे उपशिक्षक आहेत. त्याठिकाणी त्यांचा सेवार्थ आयडी काढताना त्यांचा आधारकार्ड नोकरीसाठी कोणीतरी वापरल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी शिक्ष उपसंचालकांकडे धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, वेतन अधीक्षक प्रकाश मिश्रा यांना चौकशीचे आदेश दिले.
त्यानंतर सुलभा वठारे व प्रकाश मिश्रा हे दोघेही सरस्वती माध्यमिक विद्यालय, आलेगाव खु. (ता. माढा) येथे जाऊन पडताळणी केली. तेव्हा चौकशीअंती नवगण यांची नियुक्ती कोणतीही जाहिरात न देता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता घेतल्याचे समोर आले. नवगण प्रत्यक्षात हजर नसतानाही त्यांच्या झेरॉक्स कागदत्रावरून त्यांना खुल्या प्रवर्गातून १७ डिसेंबर २०११ रोजी विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिल्याचेही दिसून आले. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार वेतन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांनी टेंभुर्णी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक पसार झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सरस्वती विद्यालयाच्या पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाला २० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर नवगण यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून हजेरीपत्रक बनवून वेतनदेयक तयार करण्यात आले. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२२ या काळातील तीन लाख ५८ हजार ६२३ रुपयांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले. नवगण यांचे जिल्हा बॅंकेच्या भीमानगर शाखेत खाते नसल्याने त्यांचे वेतन शाळेच्या खात्यात जमा झाले. त्या खात्यातून साडेसात लाख रुपये काढून दादासाहेब केचे यांनी पतसंस्थेत वर्ग केले.
दरम्यान, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, टाकळी (टेंभुर्णी पा. आढेगाव, ता. माढा) संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांनी सागर नवगण यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर शासनाची फसवणूक करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. त्यांच्याकडून सदर रक्कम वसूल करावी. व नवघण यांची सेवा शालार्थ वेतन प्रणालीतून समाप्ती करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढले आहेत.