Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचा इयत्ता दहावीचा निकाल सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल लागल्याची माहिती मुख्याध्यापक ज्योती भोसले यांनी दिली. (Sneha Thorat Pratham, a student of Swami Vivekananda Vidyamandir at Uruli Kanchan: The school’s tradition of 100% results for 7 years in a row continues..)
सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील १६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १६२ विद्यार्थी पास झाले आहेत.
यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम स्नेहा अनिल थोरात ९३.८० टक्के, द्वितीय श्रेया पिराजी खापरे ९३.६० टक्के, तृतीय रसिका धनंजय कापणे ९३ टक्के, चतुर्थ कुणाल अर्जुन नवले ९२.६० टक्के, व वैभव राम गिरी ९२.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, १६२ विद्यार्थ्यांपैकी ४४ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. ८३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३४ विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत आणि १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. (Uruli Kanchan News) या १६२ विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाळा समिती अध्यक्ष, सर्व सल्लागार समिती सदस्य, मुख्याध्यापक ज्योती भोसले यांनी अभिनंदन केले.(Uruli Kanchan News) तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.