दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या विविध शाखांमध्ये सुमारे सात हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिवाजी शिक्षण संस्थेचा गुणवत्तेचा ब्रँड निर्माण करावा, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.(Indapur News)
सात हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडाच्या वतीने संस्थेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या नऊ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.(Indapur News)
यावेळी संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, शिवाजी पाटील, श्रीमती एम. एस. भोसले, डी. जे. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव किरण पाटील, सुरेश मेहेर, उमेश सुर्यवंशी, प्रसाद पाटील, दादासाहेब घोगरे, बाळासाहेब कोकाटे, सुधीर पाटील, स्वप्निल घोगरे, हरिभाऊ बागल, संजय घोगरे, शिवाजी कोरटकर, नामदेव घोगरे, शंकर घोगरे, रणजीत वाघमोडे, मोहन कोरटकर, धनाजी घोगरे, बाळासाहेब घोगरे, प्राचार्य डी. आर. घोगरे, जी. एस. घोरपडे, सी. टी.कोकाटे, भीमराव आवारे, ए. बी. सुळे, एस. डी.घोगरे, डॉ. एल. एस. वावरे, गुरव, व्ही. के. मोहिते आदी उपस्थित होते.(Indapur News)
यापुढे बोलताना पाटील म्हणाले, “या शिक्षण संस्थेचा विस्तार वाढला आहे. संस्थेच्या वाढीसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी परिश्रम घेतले. कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात कले पाहिजे. आपल्या शिक्षण संस्थेतून अष्टपैलू विद्यार्थी निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.(Indapur News)
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व्ही. बी. मेटकरी, डी. जी. गायकवाड, व्ही. यु. बारबोले, ए. पी. देशपांडे, श्रीमती एम. एस. भोसले, ए. डी. होनमाने, बी. एस. चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन अमर निलाखे व एस. टी. मुलाणी यांनी तर आभार संतोष सुर्यवंशी यांनी मानले.(Indapur News)