Shirur News शिरूर : कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथे विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक हारूण आत्तार यांनी विद्यार्थी विद्याधाम विद्यालयात शिक्षणासाठी सुरक्षीत आहेत. (Shirur News) हे सांगताना कार्यक्रमात कंटाळलेल्या विद्यार्थ्याना कथा सांगत प्रबोधन केले. (Shirur News)
मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण किंवा नोकरी करणे फार अवघड
आत्तार म्हणाले की, मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण किंवा नोकरी करणे फार अवघड असते. आपल्या गावात शिक्षण घेण सोप असत पण बाहेर राहून शिक्षण घेण किंवा नोकरी करणे अवघड असते. त्यात लोकलचा प्रवास करणे अवघडच… तुम्ही कोणी मुंबईतल्या लोकल मधून प्रवास केला आहे काय ? असा सहजच सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हात वर केले. अरे वा म्हणत… गावाकडच्या विद्यार्थ्यांनी मुंबई लोकल चा अनुभव मिळाला चांगलच झाल.
प्राचार्य शिंदे सर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहल केली की काय ? असे म्हणत. बोट वर केलेल्या विद्यार्थ्याला ते म्हणाल. अरे ये बाळा… तू मुंबई लोकलचा प्रवास केला आहे. त्यावर तो विद्यार्थी नाही म्हणाला. पहा किती आत्मविश्वास आहे. एवढा आत्मविश्वास असल्यावर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही जीवनात कुठेही यश मिळवणार यात काय शंका नाही. असेही त्यांनी सांगितले. त्यावर चांगलाच हशा सभागृहात झाला. त्यावर त्यांनी पुढे कथा सांगण्यास सुरवात केली.
एक महिला मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळली होती. रोजचा प्रवास, आरोग्य, नोकरी करणे अवघड असते. त्यात पुन्हा सकाळ, दुपार व रात्र या काळातले जेवन ही कामे करताना ती कंटाळली होती. शेवटी आईला तीने सांगितले की, मी आता नोकरी सोडून देणार. मला हे कंटाळवाणे जीवन आवडेनासे झाले आहे.एके दिवशी ती सहज कामावरून सुट्टी झाल्यावर रेल्वे स्टेशनला आली. सायंकाळचा परतीचा प्रवास असल्याने गर्दी भयंकर होती.
लोकल रेल्वे चा प्रवास म्हटल की डब्यात चढणे व उतरणे हा अनुभव सगळ्यात अवघड. त्यातून तीने कसाबसा आतमध्ये प्रवेश मिळवला. रेल्वे डब्यात आतमध्ये प्रवेश मिळाला तरी बसण्यासाठी जागा मिळेलच अशी शाश्वती नसते. तीन शीटवर बसल्यानंतर आपन चौथे कसे बसायचे हा प्रश्न नेहमी भेडसावणार असतो. तरीदेखील तीन सिटवर बसल्यानंतर आप भी बैठ जावो. असे बसलेल्या दुसऱ्या महिलेने तिला सांगितले.
त्यावर ती प्रवासाला कंटाळलेली महिला म्हणाली की, नको मला समाधान वाटत नाही, पुरेसे वाटत नाही. त्यावर दुसरी महिला तीला म्हणाली, बैठ जावो. तरी देखील ती महिला काही बसेना. त्यावर ती म्हणाली…थोडा बर्दास्त करना पडेंगा, आदत हो जाएंगी. तरी ती महिला काही बसेना. तरी त्या दुसऱ्या महिलेने आप बैठ जावो. असे म्हटले. त्यावेळी तीन सिटवर ती चौथी महिला म्हणून बसली. त्यावेळी तिचे उत्तर आले. अब अच्छा लगता है.
खर तर आपन आयुष्यात संकटाला सामोरे जात असताना सुरक्षित नसल्याचा आव आणतो. त्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढचा प्रवास करायला शिका. थोडा त्रास होईल. पण त्यातून समाधान मिळविण्याचा प्रयत्न करा. आपन खरे यशस्वी होणार असतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. या प्रबोधनावर सभागृहात टाळ्यांचा वर्षाव झाला.