मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेसंबंधी संभ्रमात असणाऱ्या विद्यार्थासाठी गुड न्यजून आहे. रद्द झालेल्या या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या या परिक्षा मुंबई विद्यापिठाकडून 18 जुलै म्हणजे सोमवारी आणि 19 जुलै म्हणजे मंगळवारी घेण्यात येणार आहे. तरी नव्या वेळापत्रकाबाबतची संपूर्ण माहिती मुंबई विद्यापिठाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website) देण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला होता. यामुळे मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखेतील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रद्द झालेल्या या परिक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार असा प्रश्न विद्यार्थांना पडला होता. विद्यापीठाकडून आता परिक्षेच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परिक्षा केंद्रात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठकडून (Mumbai University) अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy) आणि एसएससी फायनान्सच्या (SSC Finance) एकूण 9 विषयांचे पेपर रद्द करण्यात आले होते. तर आता या तिन्ही शाखेतील विद्यार्थांचे हे 9 पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे.
पुन्हा घेण्यात येणाऱ्या परीक्षा :
कम्युनिकेशन स्किल्स (Communication Skills), बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स-I (Bussiness Communication Ethics 1), फायनान्शिअल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट (Financial Accounting and Management), एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट , बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट (Business Infrastructure and Management), ईआरपी (ERP), एथिक्स आणि सीएसआर (Ethics and CSR), फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज (Field Income Security), क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी