लहू चव्हाण
( Satara News )पाचगणी : भारती विद्यापीठ (Bharti univercity) संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ. पतंगराव कदम लोकनेते होते त्यांनी राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी साहेबांनी वयाच्या १९ व्यावर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली असे प्रतिपादन भारती विद्यापीठ गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल हायस्कूलचे प्राचार्य कुर्माराव रेपाका यांनी काढले.
काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम साहेब यांचा ५ वा स्मृतिदिन साजरा…
गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारती विद्यापीठाचे संस्थापक राष्ट्रीय काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम साहेब यांचा ५ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी रेपाका बोलत होते.
यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम (वहिनी साहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रेरणेने संचालक एम. डी. कदम सर व डॉ. अरुंधती निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. वरिष्ठ लिपिक हनमंत मोरे यांनी साहेबांच्या कारकिर्दीतल्या आठवणींना उजाळा देत काही अनुभव सांगितले. कु.रिया मोरे व अमेय म्हस्कर यांनी मनोगते व्यक्त केली तर मयंक काटकर या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पाचगणी नगरपरिषदेचा ६५ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर
पाचगणी येथील भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा
पाचगणीतील भिलार येथे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन