विशाल कदम
जिंती : जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत जिंती (ता. करमाळा) येथील समृद्धी संतोष जगताप हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
नवोदय विद्यालय समितीने आज जवाहर नवोदय विद्यालयाच्या 2022 च्या परीक्षेचा इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत समृद्धी जगताप हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. समृद्धी ने मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातील नागरिकांकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे.
समृद्धी जगताप हिचे वडील जिंती येथील प्राथमिक शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापक आहे. तर आई स्मिता या आरोग्य विभागात काम करतात. घरचे शैक्षणिक वातावरण असल्याने समृद्धीला अभ्यासाची आवड होती. या परीक्षेतील यश आई-वडील व शिक्षक यांच्यामुळे मिळाले आहे. असे समृद्धीने सांगितले आहे.
दरम्यान, केंद्रीय पाठ्यक्रम अंतर्गत केंद्र सरकारने सुरू केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राज्य स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो.