Sahakar Bharti news : पुणे : सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश या संस्थेचे वतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर जिल्हा सोलापूर येथे सहकारी साखर कारखाना सबलीकरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर यांचे हस्ते झाले. (Sahakar Bharti news)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे होते, तर मार्गदर्शक म्हणून एन.सी.यु.आय चे संचालक डॉ. उदय जोशी व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ हे होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. (On behalf of Sahakar Bharti, Maharashtra Pradesh, a workshop was held at Sripur factory)
साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा
आपल्या स्वागतपर भाषणात बोलतांना सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश चे सहकारी साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख चंद्रकांत काळे यांनी सांगितले की, सहकार भारती ही संस्था सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. महाराष्ट्र शेती प्रधान देश असून बहुतांशी शेतकरी ऊस पिकाशी जोडलेले आहेत. (Sahakar Bharti news ) भारत देश जागतिक पातळीवर साखर ऊत्पादनात अग्रेसर असून महाराष्ट्र राज्य देखील अग्रस्थानी असून साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.श्री.यशवंत कुलकर्णी यांनी केले. या वेळी बोलतांना ते म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांचे अडचणींचा अभ्यास करण्यासाठी साठी ही कार्यशाळाआहे. (Sahakar Bharti news)भारता मध्ये एकूण नऊ लाख सहकारी संस्था असून त्या पैकी पंचवीस टक्कें पेक्षा जास्त म्हणजे सुमारे अडीच लाख सहकारी संस्था एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत. अंतर राष्ट्रीय बाजारात साखरे चे दर वाढल्या मुळे केंद्र सरकारने काही अंशी साखर निर्यातीस परवानगी दिल्यास कारखान्यांमध्यॆ सुदृढता येईल.
सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर म्हणाले की, सहकाराचे बीज महाराष्ट्रात रूजले आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात सुरू झाला आहे. (Sahakar Bharti news ) सहकाराचे महत्त्व व योगदान फार मोठे आहे. सहकारा मुळे जास्तीत जास्त लोक जोडले जातात. महाराष्ट्राचा परिचय सहकार आहे. सहकाराचे खाजगीकरण कां होत आहे,याचा विचार केला पाहिजे. नेतृत्व, व्यवस्थापन, त्याग,समर्पित भावना,उद्देश इ.गोष्टी नाहिशा होत चालल्या मुळे सहकार अपयशी होत चालला आहे. पुर्वी सारखी सहकार चळवळ येणे साठी सर्वांनी संघटित व्हायला पाहिजे.सहकारा मध्ये पारदर्शकता, विश्वास व परोपकारी भावना हवी व सहकाराला पुन्हा ऊभारणी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
सहकारी साखर कारखान्यांपुढील आव्हाने या विषयावर बोलतांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचाल .प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांचे सबलीकरण ही काळाची गरज आहे.सहकारी साखर कारखानदारी सध्या निर्णायक वळणावर आहे.(Sahakar Bharti news) सहकाराचा इतिहास दैदिप्यमान आहे.या ऊद्योगाने अनेक चढउतार पाहिले आहेत. भांडवलशाहीच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी सहकाराची स्थापना झाली.महाराष्ट्रा मध्ये सहकारी संस्थांचे जाळे असून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे,त्यास तोड नाही. सहकारातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत असून नवनवीन ऊत्पादने होत आहेत.
केंद्र शासनाकडून स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यामुळे सहकाराला नवसंजीवनी मिळाली आहे. सहकारी साखर कारखान्यावरील गेल्या चवतीस वर्षापासून असलेले आयकराचे सावट या मंत्रालयाचे प्रयत्नातून दूर झाले आहे.(Sahakar Bharti news ) सध्या केंद्रीय सहकार मंत्रालयाचे मार्फत सहकारी साखर कारखान्यांचे प्रलंबित कर्जांचे एकत्रीकरण करून पुनःर्बांधणी करणे व नवीन कर्ज ऊपलब्ध करून देणे तसेच राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ चे माध्यमातून इथेनॉल साठी कर्ज ऊपलब्ध करून देणे चा विचार चालू आहे.सहकारी साखर कारखान्यांपुढील आव्हाने संदर्भात त्यांनी मानसिकतेत बदल -नवीन संशोधन स्विकारणे,व्यावसायिक निपुणता – तज्ञ पारंगत टीम नेमणे,जागतिक घटनांची माहिती, अर्थशास्राची मूलभूत तत्व, वेळेनुसार बदल,मार्केटिंग ॲण्ड ब्रँडींग व अभ्यास आणि प्रशिक्षण या प्रकारची निरिक्षणे नोंदविली आहेत.
सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक शिस्त व व्यवस्थापन या विषयावर बोलतांना महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले की ,स्वार्थ सुरू झाला की सहकार संपतो.सहकार निकोप पध्दतीने चालला पाहिजे,त्या साठी काही पथ्य पाळली पाहिजेत. महाराष्ट्र राज्या मध्ये एकूण १७९ नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने असून त्या पैकी काही कारखाने अवसायनात निघाले असून ३१ सहकारी साखर कारखान्यांची विक्री झालेलीआहे व १६ कारखाने चालूच झालेले नाहीत. मागील गाळप हंगामात १०६ सहकारी साखर कारखाने चालू होते त्या पैकी १८ कारखाने भाडे तत्वाने चालविण्यास दिलेले आहेत. भांडवली अर्थ संकल्प, भांडवली आराखडा, खेळते भांडवल या तीन गोष्टींवर आर्थिक व्यवस्थान अवलंबून असते. कारखान्यांनी क्रेडिट रेटींग करून घ्यावे,अनावश्यक यंत्र सामुग्री,साहित्य सामुग्री खरेदी, मनुष्यबळ टाळावे.मालाचे एबीसी अनॅलेसिस करणे गरजेचे आहे (Sahakar Bharti news).मशिनरी दुरूस्ती देखभाल, विपणन इ.बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. यावर उपाययोजना म्हणून कारखान्यांनी ऑडीट,इथीक्स कमिटी स्थापन करणे, वार्षिक बजेट,मंथली बॅलन्सशीट,इंटरनल ऑडीट टीम, मंथली काॅस्ट ऑडीट इ.गोष्टी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .
एन.सी.यू.आय चे संचालक डॉ.श्री.ऊदय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सहकारी संस्था व्यवसायांचा मालकी हक्कांचा पॅटर्न आहे. सहकारी साखर कारखाने व्यावसायिक पध्दतीने चालविले पाहिजेत. सार्वत्रिकरणाचा विचार करून सरकार कडून निर्णय घेतले जातात. सहकारी बॅंका,पतसंस्था, साखर कारखाने यांची शासनाने नोंदणी बंद केली आहे, मात्र खाजगी कंपनीना दोन दिवसात मंजूरी मिळते.काही मुलभुत बदल केले पाहिजेत. आर्थिक दुर्बलांचा विकास म्हणजेच सहकार, एक व्यक्ती एक मत हे सहकाराचे तत्व असून सामाजिक दृष्टिकोन फार पूर्वीपासूनच सहकाराने स्विकारला आहे.बिना संस्कार नही सहकार हे सहकार भारती चे तत्व असून सहकाराची शिस्त,नियम,चौकट,मूलत्तव पाळणे म्हणजेच संस्कार. कालानुरूप, कालसुसंगत बदल आवश्यक असून सहकारी क्षेत्रास दिशा देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
सहकार भारती,प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस सहकार भारती,महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री विवेक जुगादे,संजय पाचपोर, श्रीकांत पटवर्धन, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक, सहकार भारतीचे पदाधिकारी, विविध सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते. वरील प्रमाणे माहिती सहकार भारतीचे पदाधिकारी गिरीश भवाळकर, औदुंबर नाईक, साहेबराव खामकर ,बाळासाहेब भिंगारकर यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur Crime News : बनावट शिक्षक तयार करून मुख्याध्यापकानेच हडपला साडेतीन लाख रुपयांचा पगार…!