लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील इनडोअर बॉक्सिंग हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय व्यावसायिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन सबरी जे ने एचसी लालरामफेलावर याला पराभूत करून इंडीयन बॉक्सिंग कौन्सिलचे वेल्टरवेट विजेतेपद कायम राखले. तसेच मुलींच्या गटात मुळच्या हरियाणाच्या असलेल्या चांदनी मेहराने सुपर फेदरवेट प्रकारात डब्ल्यूबीसी (WBC) इंडिया नॅशनल बॉक्सिंगचे विजेतेपद पटकावले. तिने ८ फेऱ्यांच्या कठोर परिश्रमानंतर मुस्कान श्रीवास्तववर मात केली.
सबरी जे याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेतेपद जिंकल्यापासून पराजित झाला नाही. त्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते, तथापि, लालरामफेलाने याने सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन केले. २५ वर्षीचा तामिळनाडू बॉक्सरने आता त्याच्या मागील ९ फाईट्समध्ये ८ विजयाचा विक्रम केला आहे. साबरी जे आणि चांदणी यांच्या विजयानंतर एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड, इंडीयन बॉक्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. के. मुरलीधरन राजा यांच्या हस्ते टायटल बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा रोटरी क्लब पुणे, एम आय टी ए डी टी विद्यापीठ, एम आय टी डब्ल्यूपीयू आणि इंडीयन बॉक्सिंग काऊन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
प्रा.डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, ही संस्था १९८३ साली स्थापन झाल्यापासून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. खेळाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याच्या या ध्येयाकडे असलेल्या आमच्या समर्पणाचा विस्तार आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सर्व लोक ज्या पद्धतीने जमले आहेत ते पाहून मला खूप आनंद झाला.
हरियाणाच्या मूळच्या चांदनी मेहराने सुपर फेदरवेट प्रकारात WBC इंडिया नॅशनल बॉक्सिंगचे विजेतेपद पटकावले आणि ८ फेऱ्यांच्या कठोर परिश्रम नंतर मुस्कान श्रीवास्तववर मात केली. अंतिम स्कोअर कार्ड ७२-८०,७१-८०, ७१-८० असा होता आणि सर्व ३ पंचांनी एकमताने चांदनी हिला विजयी घोषित केले.
पंजाबच्या गुरप्रीत सिंगने वेल्टरवेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तामिळनाडूच्या जयपाल जगन्नाथनला नॉकआउट केले. हरियाणाच्या रोहित चौधरी (२ विजय-१ पराभव) याने गोवाचे फेदरवेट अशोक पाटील (१ विजय-१ पराभव) बरोबर बरोबरीत सोडवले. सहाव्या फेरीच्या लढतीत दोघांना ही ऐकत्रित घोषित केले.
पंजाबच्या आकाशदीप सिंगने त्यांच्या ६ फेऱ्यांच्या वेल्टरवेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मध्य प्रदेशच्या सुफियान खानला नॉकआउट केले. किडरपोरचा मुष्टियोद्धा मजहर हुसेन याला ६ फेऱ्यांच्या वेल्टरवेट स्पर्धेत गोव्याच्या उमेश चव्हाण विरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले.
महिलांच्या फ्लायवेट स्पर्धेत, ३४ वर्षीय अनिता गेल्या ४५ दिवसांत सलग ३ विजयांसह या लढतीत उतरत होती, तिच्या लढतीत ताण दिसून आला. पंजाबच्या 21 वर्षीय अपस्टार्टने अनितावर ६ फेऱ्यांमध्ये वर्चस्व राखले.
या विजयाबद्दल एमआयटीएडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मंगेश कराड, प्र कुलगुरू डॉ अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ महेश चोपडे आणि क्रीडा संचालक प्रा पद्माकर फड यांनी सर्व मुष्टियोध्यांचे अभिनंदन केले.