पुणे : डेहराडून येथील ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज’साठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ३ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते.
या परीक्षेसाठी सातवीत शिकत असलेल्या किंवा सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. वयोमर्यादा ही ११ वर्षे सहा महिन्यांपुढे ते १३ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यी यासाठी पात्र आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
लष्करातील विविध पर्याय आता मुलींसाठी खुले झाले आहेत. आरआयएमसी अंतर्गत ही प्रक्रिया फक्त इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा असून लेखी व मौखिक परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
परीक्षेचे माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना www.mscepune.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.