लोणी काळभोर, (पुणे) : येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा (सीबीएसई) दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज शुक्रवारी (ता.२२) जाहीर झाला. या परीक्षेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचा विद्यार्थी सार्थक संदीप काळभोर याने ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, सचिव राजेश काळभोर, संस्थेच्या विश्वस्त मंदाकिनी काळभोर व मनीषा काळभोर, प्राचार्य मीनल बंडगर, रेनबो किड्स कायझन स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील शौक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, या वर्षी रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील हि पहिलीच तुकडी आहे. या निकालाने संस्थेची भविष्यात दैदिप्यमान वाटचाल कायम ठेऊन अशीच परंपरा कायम राहील असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांनी व्यक्त केला आहे. लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांनी दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर शाळेचेही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले शाळेतील पाहिले तीन विद्यार्थी
सार्थक संदीप काळभोर – ९४ टक्के, हर्षद चोरघडे – ८७ टक्के, अभय निंबाळकर – ८६ टक्के,