लोणी काळभोर – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) मधील बीएस्सी- नॉटिकल सायन्सच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी कॅडेट रॅंडी ऑर्टन ने चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम येथे आयोजित (१८ वर्षांखालील) राज्य तलवारबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
रँडी मुळात कन्या कुमारी (तामिळनाडू) येथील असून मर्चंट नेव्ही अधिकारी होण्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रशिक्षण घेत आहे. रॅडी ऑर्टनने वयाच्या १४ व्या वर्षी तलवारबाजीचा सराव सुरू केला होता. आतापर्यंत त्याने ८ राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे आणि सर्कल फेंसिंगमध्ये 2 सुवर्णपदके जिंकली आहेत.
एमआयटी एडीटी विद्यापीठातील क्रीडा संकुलात तलवारबाजीचा सराव करत आहे. नाशिक येथे ११ ते १३ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
विद्यार्थी रॅडी ऑर्टन याच्या यशासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. मंगेश कराड, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन अमोल आठल्ये, उप-प्राचार्य प्रा. श्रीकांत गुंजाळ आणि क्रीडा संचालक श्री. पद्माकर फड (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांनी अभिनंदन केले. तसेच रौप्य पदक मिळवण्याच्या यशाबद्दल आणि आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.